मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागलमध्ये साकारले आकर्षक सेल्फी पॉइंट्स



कचरा ढिगांच्या जागी रंगतदार सौंदर्यस्थळे; विभागनिहाय वैशिष्ट्ये अधोरेखित

कोल्हापूर / शेखर धोंगडे :  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून आणि कागल नगरपरिषदेच्या पुढाकारातून शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच स्वच्छ कागल या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ठिकठिकाणी आकर्षक सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. यापूर्वी ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत होते, अशा पाच महत्त्वाच्या ठिकाणी हे सेल्फी पॉईंट्स साकारण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणांचे रूपांतर आता शहराच्या सौंदर्याचे प्रतीक बनले आहे.

प्रत्येक विभागातील सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थानिक ओळख लक्षात घेऊन हे सेल्फी पॉईंट्स रचले गेले आहेत. ज्या भागात विशिष्ट समाज, परंपरा किंवा स्थानिक घटक प्रबळ आहेत, त्या अनुषंगाने प्रतीकात्मक संदेश आणि दृश्यात्मक मांडणी करण्यात आली आहे. ज्या जागी पूर्वी अस्वच्छता होती, तेथे आता स्वच्छता, आकर्षकता आणि जनजागृतीचा संगम दिसतो आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

विविध रंगसंगती, लाईटिंग, स्थानिक घटकांचा वापर आणि सुंदर डिझाईन यामुळे हे सेल्फी पॉईंट्स आता कागलकरांसाठी नवीन "फोटो स्पॉट्स" ठरले आहेत. या प्रकल्पातून कागल शहराची सामाजिक एकता, प्रगतीशील विचार आणि सौंदर्यदृष्टी स्पष्टपणे दिसून येते.



 कागलमधील प्रमुख ५ सेल्फी पॉईंट्स

1️   कागल – वाय. डी. माने शिक्षण संकुल मार्गावर:
विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतलेले दाखवणारा, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा सेल्फी पॉईंट.

2️    स्मशानभूमी परिसरात:
जीवनाच्या प्रवासाचे प्रतीक दाखवणारा, बाल्यापासून शेवटपर्यंतचा भावनिक संदेश देणारा सेल्फी पॉईंट.

3️     रिंग रोड – माधव हॉस्पिटल जवळ:
स्वच्छतेचा संदेश देणारा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ उभारलेला सेल्फी पॉईंट.

4️   एमआयडीसी रोड – पसारेवाडी परिसरात:
औद्योगिक भागाच्या ओळखीला साजेसा आधुनिक शैलीचा सेल्फी पॉईंट.

5️    मुरगुड रस्ता – वड्डवाडी जवळ:
ग्रामीण संस्कृती आणि शहराच्या सुसंवादाचे प्रतीक दाखवणारा आकर्षक सेल्फी पॉईंट.





Post a Comment

Previous Post Next Post