विश्व हिंदू परिषद- बजरंग दलातर्फे निवेदन
दिवा \ आरती परब : दिवा पश्चिमेत धर्मांतराच्या प्रकरणावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाल म्हात्रे या अपंग युवकासोबत संतोष अल्हाट या ख्रिश्चन पादरीने त्याच्या अपंगत्वाविषयी अयोग्य टिप्पणी करत हिंदू देवदेवतां विषयीही अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विशाल म्हात्रेने आपल्या काही मित्रांना बोलावले. मात्र परिस्थिती पाहून पादरी घाबरून पळताना पाय घसरुन पडल्याची माहिती मिळाली.
या घटनेनंतर तीन दिवसांनी संतोष अल्हाट या पादरीने उलट विशाल म्हात्रे आणि दिवा गावातील काही तरुणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईच्या विरोधात आणि घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद- बजरंग दल, कळवा- मुंब्रा, दिवा विभाग यांनी मुंब्रा पोलिसांना निवेदन दिले आहे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या प्रकरणात खोटे आरोप लावून हिंदू युवकांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. ख्रिश्चन पादरीकडून झालेल्या हिंदू देवदेवतांच्या अवमानावर कारवाई करण्यात यावी आणि गावात शांतता राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
