पेटीएमवर सोने खरेदीचे अनेक स्मार्ट पर्याय



मुंबई : भारतीय संस्कृतीत सोने केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नाही; ते बचत आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः धनत्रयोदशी हा सोने खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. परंपरेला आधुनिक रूप देत पेटीएम आता सोने खरेदी अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोपी बनवत आहे.


पेटीएम डिजिटल गोल्डच्या माध्यमातून वापरकर्ते फक्त ५१ रुपयांपासून २४ कॅरेट शुद्ध सोने खरेदी करू शकतात. हे सोने सुरक्षितपणे भागीदार बँकांकडे साठवले जाते आणि त्याची किंमत रिअल टाइममध्ये पेटीएम ॲपवर पाहता येते. दीर्घकालीन बचतीसाठी पेटीएमने डेली, वीकली आणि मंथली एसआयपी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक व्यवहार डिजिटल लॉकरमध्ये नोंदवला जातो आणि सोने कधीही विकता किंवा रिडीम करता येते. लवकरच, वापरकर्त्यांना बीआयएस प्रमाणित हॉलमार्क गोल्ड डिलिव्हरीची सुविधा देखील मिळेल.


पेटीएमने अलीकडेच पेटीएम गोल्ड कॉईन्स ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक पेमेंटवर वापरकर्त्यांना गोल्ड कॉइन मिळतात, जे नंतर डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करता येतात. प्रत्येक व्यवहार स्कॅन अँड पे, ऑनलाइन खरेदी, रिचार्ज, बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर यावर गोल्ड कॉइन मिळतात. १०० गोल्ड कॉइन म्हणजेच १ रुपयाचे डिजिटल गोल्ड असून एकदा १५०० कॉइन जमा झाल्यावर ते सहजपणे डिजिटल गोल्डमध्ये बदलता येतात.


पेटीएमचा डेली गोल्ड एसआयपी फक्त ५१ रुपयांपासून पासून सुरू होतो. हे योजनाबद्ध गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि सोयीचे साधन आहे. या धनतेरसला पेटीएमच्या डेली गोल्ड एसआयपीद्वारे घराघरात समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक कायम ठेवा.




 


 



Post a Comment

Previous Post Next Post