किया इंडियाद्वारे कॅरेन्स क्लॅव्हिस लाइनअपचा विस्तार
मुंबई : भारताच्या आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमोबाइल ब्रँड किया इंडियाने आपल्या लोकप्रिय आरव्ही मॉडेल कॅरेन्स क्लॅव्हिसच्या लाइनअपचा विस्तार जाहीर केला आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्यतेला अधोरेखित करत कंपनीने नवीन एचटीएक्स (O) ट्रिम आणि सहा-आसनी व्हेरिएंट्स सादर केले आहेत.
१९,२६,७१७ रुपये (एक्स-शोरूम) या आकर्षक किंमतीपासून सुरू होणाऱ्या एचटीएक्स (O) ट्रिममध्ये प्रीमियम वैशिष्ट्यांची प्रभावी यादी आहे. बोस प्रीमियम साउंड सिस्टिमसह ८ स्पीकर्स, ड्राईव्ह मोड सिलेक्ट (इको/नॉर्मल/स्पोर्ट) (७डीसीटी), स्मार्ट की रिमोट इंजिन स्टार्ट (७डीसीटी), आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड (७डीसीटी) चा समावेश आहे.
हा नवीन ट्रिम एचटीएक्स व्हेरिएंटच्या वरचा पर्याय असून ६-आसनी आणि ७-आसनी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. यात स्मार्टस्ट्रीम जी१.५ टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन आणि ७-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (७डीसीटी) आहे, ज्यामुळे अधिक सुलभ आणि प्रतिसादक्षम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
ग्राहकांकडून वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, किया इंडियाने एचटीके+ (जी१.५टी ७डीसीटी व डी१.५ ६एटी) आणि एचटीके+(O) (जी१.५टी ७डीसीटी) या ट्रिम्समध्येही सहा-आसनी व्हेरिएंट्सची भर केली आहे. या नव्या पर्यायांमुळे कॅरेन्स क्लॅव्हिस परिवारासाठी अधिक लवचिक, आधुनिक आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाले आहेत.
किया इंडियाचे विक्री व विपणन वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रमुख अतुल सूद म्हणाले की, आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांना ओळखून आम्ही कॅरेन्स क्लॅव्हिस लाइनअप अधिक बळकट करत आहोत. नवीन एचटीएक्स (O) ट्रिम आणि सहा-आसनी व्हेरिएंट्सद्वारे आम्ही ग्राहकांना अधिक पर्याय देत आहोत, जे आराम, डिझाइन आणि तंत्रज्ञानाचे उत्तम संयोजन सादर करतात. आमचा प्रत्येक नाविन्यपूर्ण प्रयत्न ग्राहकांच्या प्रेरणेवर आधारित आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की या नव्या लाइनअपमुळे अधिकाधिक ग्राहक तडजोड न करता त्यांच्या गरजेनुसार वाहन निवडतील.
किया कॅरेन्स क्लॅव्हिस भारतातील आधुनिक कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. एसयूव्हीची क्षमता, एमपीव्हीचा आराम आणि फॅमिली कारची बहुपयोगिता यांचे हे सुंदर मिश्रण आहे. शहरातील दैनंदिन प्रवास असो वा लांबपल्ल्याचा प्रवास ही गाडी प्रत्येक प्रवासात उत्कृष्ट कामगिरी आणि आराम देते.
दुसऱ्या रांगेत स्लायडिंग, रिक्लायनिंग आणि वन-टच इलेक्ट्रिक टंबल सीट्स देऊन तिसऱ्या रांगेत सहज प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल, बोस प्रीमियम साउंड सिस्टिम, ६४ कलर अँबियंट लाइटिंग, आणि इन्फोटेन्मेंट-टेम्परेचर कंट्रोल स्वॅप स्विच यांसारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी केबिन अधिक आकर्षक आणि सोयीस्कर बनवण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने, कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये एडीएएस लेव्हल २ सह २० ऑटोनॉमस वैशिष्ट्ये आहेत. तसेच १८ प्रगत पॅसिव्ह सेफ्टी फीचर्ससह सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट, रिअर ऑक्युपंट अलर्ट आणि रोलओव्हर सेन्सर यांसह सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली आहे.
किया कनेक्टच्या मदतीने वापरकर्त्यांना रिमोट अॅक्सेस, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि ओव्हर-द-एअर अपडेट्ससारख्या स्मार्ट कनेक्टेड वैशिष्ट्यांचा लाभ मिळतो, ज्यामुळे अनुभव, सुरक्षितता आणि सोयीचा स्तर अधिक वाढतो.
नवीन एचटीएक्स (O) ट्रिमच्या भरसह कॅरेन्स क्लॅव्हिस आता आठ ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे.
एचटीई, एचटीई(O), एचटीके, एचटीके+, एचटीके+(O), एचटीएक्स, एचटीएक्स(O) आणि एचटीएक्स+.
ही नवीन मॉडेल्स १३ ऑक्टोबर २०२५ पासून भारतभरातील किया शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.