कॅनरा बँक संस्थापक दिन उत्साहात साजरा

 


संस्थापक श्री अम्मेंबल सुब्बाराव पै यांच्या १७३व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

कोल्हापूर \ शेखर धोंगडे :  देशातील विश्वासार्ह सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँक प्रादेशिक कार्यालयात संस्थापक श्री अम्मेंबल सुब्बाराव पै यांची १७३ वी जयंती उत्साहात, स्नेहपूर्ण वातावरणात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. शहरातील विविध शाखांमधील ग्राहक, शाखा प्रमुख तसेच RO, सुलभ आणि RAH विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमास आर. अरामिर्थम (AGM व Regional Head),  बी. दीपचंद (Divisional Manager),  पंकज पाटील (Divisional Manager) आणि मुरुगेसन अरुमुगम (Divisional Manager) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समारंभाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थापकांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. कॅनरा बँकेचा इतिहास, संस्थापक पै यांचे कार्यमूल्य, तत्त्वज्ञान आणि समाजाभिमुख विचार यावर आधारित माहितीपूर्ण प्रस्तुतीने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.




यावेळी AGM व प्रादेशिक प्रमुख आर. अरामिर्थम यांनी बँकेच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेतला. ते म्हणाले, “कॅनरा बँक म्हणजे विश्वास, पारदर्शकता आणि सेवा. ग्राहकांनी वर्षानुवर्षे दाखवलेला विश्वासच आमच्या प्रगतीचा खरा पाया आहे.


 ग्राहकांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली तसेच भविष्यात अधिक सक्षम सेवांचे आश्वासन दिले. उपस्थित ग्राहकांनी व्यवसायाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर कॅनरा बँकेने दिलेल्या वेळेवर मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बँकेच्या पारदर्शक व्यवहारपद्धती, तात्काळ सेवा, प्रामाणिक ग्राहक–केंद्रित दृष्टिकोन आणि डिजिटल सुलभतेचे सर्वांनी विशेष कौतुक केले.




कॅनरा बँक ही फक्त बँक नाही; आमच्या व्यवसायवाढीची आधारस्तंभ आहे. या सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर काही निवडक ग्राहकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केक कटिंग समारंभ, ग्राहकांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. संवाद, अनुभवविनिमय आणि आत्मीयतेच्या वातावरणात कार्यक्रम स्नेहपूर्ण आणि यशस्वीरीत्या पार पडला.

यावेळी ग्राहकांनी कॅनरा बँकेच्या तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या सेवांचे आणि अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या आपुलकीच्या संवादाचे कौतुक केले. योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक वेळी मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे अनेक उद्योगव्यवसायांना स्थैर्य मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे कोल्हापूर विभागात कॅनरा बँकेवरील जनविश्वास आणखी दृढ झाला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post