दिवा \ आरती परब : दिवा शहर पूर्व येथील सावळाराम स्मृती या तळमजला अधिक दोन मजले या जुन्या आणि धोकादायक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग काल मध्यरात्री कोळसला होता. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी स्थानिक शिवसेना विभागप्रमुख गुरुनाथ पाटील हे उपस्थित होते. बाधित रहिवाशांची विचारपूस करून त्यांना सहकार्य करण्याचे यावेळी सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिले. सद्यस्थितीत इमारतीचे ऑडिट करून इमारतीबद्दल निर्णय घेता येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार रहिवाशांना सर्व मदत केली जाणार असल्याचे विभागप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी सांगितले.
.jpeg)
