बदलापूर नगरपरिषद प्रभाग ६-अ चे उमेदवार
बदलापूर : बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6-अ मधून प्रियांका आशिष दामले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. शनिवारी बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या हस्ते दामले यांना पक्षाचा अधिकृत बी फॉर्म प्रदान करण्यात आला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी शहरातील संघटन बळकट करण्यासाठी केलेले काम, तसेच बदलापूर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी प्रस्थापित केलेला सातत्यपूर्ण संवाद यामुळे त्यांची जनाधार वाढत गेली आहे. महिलांच्या प्रश्नांपासून स्थानिक पायाभूत सुविधांपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करत आगामी निवडणुकीत त्या निश्चितच विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
