राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऋता आव्हाड यांचा अर्ज दाखल



ठाणे : ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी मिळावी यासाठी ऋता जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पक्षाच्या ठाणे येथील कार्यालयात उपस्थित राहून आपला इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला.


अर्ज दाखल करताना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, विभागप्रमुख, महिलाविभागातील कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमुखाने ऋता ताईंच्या निर्णयाचे स्वागत केले आणि आगामी राजकीय प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


ऋता आव्हाड या ठाणे शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमुळे ओळखल्या जातात. स्थानिक पातळीवर महिलांचे प्रश्न, नागरी सुविधा, स्वच्छता मोहीम, तसेच नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास प्रभाग २३ साठी ठोस विकासाचा ध्यास घेऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.


 

Post a Comment

Previous Post Next Post