जळगाव : यंग इंडिया–फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘सुपोषित जळगाव’ उपक्रमांतर्गत शनिवारी (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये भव्य सामूहिक सूर्यनमस्कार आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी एकत्र येत तंदुरुस्तीचा संदेश दिला.
सूर्यनमस्काराचे महत्त्व
• शरीराची लवचिकता वाढवते
• शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती सुधारते
• सर्वांगीण आरोग्य वृद्धिंगत करते
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
‘सुपोषित जळगाव’ मोहिमेअंतर्गत दर शनिवारी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात असून जिल्हाभरातून मिळणारा प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे प्रशासनाने सांगितले.


