श्री शिव-साई” सार्वजनिक महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात



दिवा / आरती परब : दिवा श्लोक नगर फेज-२, मुंब्रादेवी कॉलनी येथे “श्री शिव-साई” सार्वजनिक महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे व अश्विनी अमोल केंद्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या ठिकाणी अनेक वर्षांपासून महादेवाची नियमित पूजा-अर्चा सुरू असून परिसरातील भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला होता. अखेर हा संकल्प प्रत्यक्षात उतरल्याने शिवभक्त व साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्राणप्रतिष्ठा, अभिषेक, आरती व विविध धार्मिक विधी श्रद्धेने पार पडले. या सोहळ्यास परिसरातील नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या नव्या रूपामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमामुळे धार्मिक व सामाजिक एकोपा अधिक बळकट होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Post a Comment

Previous Post Next Post