‘घड्याळ’ चिन्हावर संयुक्त लढणार
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा निर्धार
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट ‘घड्याळ’ या चिन्हावर एकत्र लढणार आहेत. माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्यात यशस्वी समझोता झाल्याची माहिती आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी उमेदवारांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांची भेट कोल्हापूरमध्ये पार पडली, जिथे त्यांनी संयुक्त निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
राज्यातील पहिला प्रयोग
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही गट एकत्र येत आहेत. हा राज्यातील पहिला प्रयोग असून, राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांचे अभिनंदन.
राजेश पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो आहोत. या तालुक्यातील आठ जिल्हा परिषद व १६ पंचायत समिती मतदारसंघात ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवार लढवण्याचे ठरले आहे. चंदगड नगरपंचायतीतील हा प्रयोग यशस्वी ठरला असून, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा शाहू–फुले–आंबेडकर विचारधारेने उंचावू.
डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, चंदगड नगरपंचायतीत दोन्ही गट एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मान्यता मिळाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सक्षम व ताकदवान पॅनल तयार केले आहे. ‘घड्याळ’ चिन्ह जनतेच्या मनामनात रुजलेले आहे; यावर आधारित आम्ही एकत्रित ताकदीने लढणार आहोत.
मतदारसंघनिहाय उमेदवार यादी
गडहिंग्लज तालुका
जिल्हा परिषद: नूल – तेजस्विनी पाटील, हलकर्णी – शिवशंकर हत्तरकी, महागाव – अमरसिंह चव्हाण, नेसरी – संग्रामसिंह कुपेकर
पंचायत समिती: नूल – शिवगोंडा पाटील, हसूर चंपू – प्रभावती बागी, हलकर्णी – अनिल देसाई, बसर्गे – रूपा केसरोळी, महागाव – डॉ. प्रतिभा चव्हाण, भडगाव – शिवाजी करीगार, नेसरी – अमर हिडदुगी, हडलगे – स्नेहल जाधव.
चंदगड तालुका
जिल्हा परिषद: अडकूर – अलकनंदा अंबादास पाटील, माणगाव – माणसी कालाप्पा भोगम, कुदनूर – विद्या विलास पाटील, तुडिये – रचना राहुल गावडे
पंचायत समिती: अडकूर – हणमंतराव दत्ताजीराव देसाई, गवसे – रेणुका दीपक कांबळे, माणगाव – विलास नाईक, कोवाड – गीता बामणे, कुदनूर – मधुकर आंबेवाडकर, तुर्केवाडी – पांडुरंग कृष्णा बेणके, तुडिये – प्रेमा जगन्नाथ हुलजी, हेरे – संज्योती संतोष मळवीकर.
आजरा तालुका
जिल्हा परिषद: पेरणोली – सुधीर राजाराम देसाई
पंचायत समिती: पेरणोली – यशोदा युवराज पोवार, वाटंगी – राजाराम गुणाजी होलम
