कल्याण–डोंबिवलीत शिंदे शिवसेना गटनेतेपदी विश्वनाथ राणे यांची निवड

 


कल्याण \ शंकर जाधव : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वनाथ राणे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 21) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ५३ नगरसेवकांचा शिवसेनेचा गट कोकण भवन येथे अधिकृतपणे स्थापन करण्यात आला.

या बैठकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने महापालिकेत मजबूत संघटनात्मक बांधणी करत नेतृत्व निश्चित केले. गट स्थापन झाल्याने येत्या काळात महापालिकेतील सत्तासमीकरणे अधिक स्पष्ट होणार असून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post