खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
दिवा \ आरती परब : कल्याण लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा प्रभाग समिती अंतर्गत फडकेपाडा गावासाठी नवीन ८ इंच व्यासाची पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला.
फडकेपाडा गावात पूर्वीची ६ इंच व्यासाची जुनी पाण्याची पाइपलाइन अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत होता. ही समस्या लक्षात घेऊन नव्याने ८ इंची पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व पुरेसा होणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रभाग २९ चे स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना निलेश पाटील, नगरसेविका वेदिका पाटील, विभाग प्रमुख निलेश पाटील, साहिल पाटील, बाळाराम पाटील, शाखा प्रमुख शंकर पाटील, शाखा प्रमुख जयंता वाळिलकर, उपशाखा प्रमुख धोंडू निघुकर, तुळशीराम पाटील, उपशाखा प्रमुख गोवर्धन म्हात्रे, संजय लाहोत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवीन पाइपलाइनमुळे फडकेपाडा गावातील नागरिकांची दीर्घकालीन पाणीटंचाई दूर होईल, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामाचा शुभारंभ झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.


