दिवा स्थानक स्वच्छतेत अव्वल


दिवा \ आरती परब : मध्य रेल्वे मार्गावरील स्वच्छ स्थानक म्हणून दिवा रेल्वे स्थानकाला यंदाच्या रेल सेवा पुरस्कारांमध्ये शिल्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे दिवा स्थानकाच्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेतली गेली आहे.

हा मानाचा पुरस्कार दिवा स्थानकाचे स्टेशन प्रबंधक मनोज गुप्ता आणि स्वच्छता अधीक्षक प्रदीप मोरे यांनी स्वीकृत केला. स्थानक स्वच्छतेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

२०२५ वर्षभर स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी २०ते २२ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत असतात. दिवा स्थानकात एकूण ८ फलाट असून, तीन पादचारी पूल आहेत. या सर्व भागांची नियमित साफसफाई करण्यात येत असून प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जातो.

या पुरस्कारामुळे दिवा स्थानकाच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, भविष्यातही स्वच्छतेचा हा दर्जा कायम ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post