उन्ह्याळ्यात त्वचा सांभाळा ....अन्यथा होईल धोका





दीर्घकाळ उन्हात राहिल्यामुळे त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे टॅनिंग, काळे डाग आणि असमान त्वचेचा रंग यासारखी समस्या आढळून येते. तसेच अतिनील किरणांमुळे त्वचेतील कोलेजन कमी होते, ज्यामुळे त्वचेचवर सुरकुत्या येणे, त्वचा निस्तेज होणे आणि त्वचा साल पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा लाल होणे, जळजळ होणे आणि संवेदनशीलता वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, सतत अतिनील किरणांच्या संपर्कात राहिल्यास त्वचेच्या पेशींचे नुकसान होऊन अ‍ॅक्टिनिक डॅमेजसारख्या समस्या निर्माण होतात आणि काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्वचारोग किंवा कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्याचबरोबर प्रदूषणासोबतच सूर्यप्रकाश त्वचेवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतो, ज्यामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते.

आजही अनेक व्यक्ती सनस्क्रीनचा वापर केवळ सहल किंवा बीचवर जाण्यापुरताच मर्यादित ठेवतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा वापर करणे, संपुर्ण अंग झाकणारे आणि  पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे तसेच दुपारच्या तीव्र उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे हे गरजेचे आहे.




#SkinCare #SunDamage #UVRays #SkinTanning #Melanin #HealthySkin #SunscreenDaily #SkinProtection #AntiAging #GlowingSkin #Dermatology#SkinHealth #SunSafety #MarathiHealth #त्वचाकाळजी #सनस्क्रीन #त्वचासंरक्षण #आरोग्य

Post a Comment

Previous Post Next Post