गुढीपाडवानिमित्त विविध उत्पादनांवर ६० टक्क्यांहून अधिक सवलत

 



विजय सेल्सचा सेल

मुंबई : विजय सेल्स या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या १२०हून अधिक स्टोअर्समध्ये तसेच विजयसेल्सडॉटकॉमवर अनेकविध डील्स व सवलतींची मालिका आणली आहे. या सेलमध्ये एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, ॲपल गॅझेट्स, ज्युसर्स व ब्लेण्डर्स, स्मार्ट फोन्स, कूकिंग इसेन्शिअल्स, लॅपटॉप्स, मोबाइल फोन्स व आणखी कितीतरी उपकरणांवर सवलत देण्यात येत आहे.

या उन्हाळ्यात तापमान त्रासदायक स्तर गाठू लागल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहक २६,९९० रुपयांपासून उपलब्ध असलेले एअर कंडिशनर्स, ४,६९० रुपयांपासून उपलब्ध असलेले एअर कूलर्स आणि १८,९९० रुपयांपासून उपलब्ध असलेले रेफ्रिजरेटर्स खरेदी करू शकतात. ग्राहक वॉशिंग मशिन्स व डिशवॉशर्सच्या १०,९९० रुपयांपासून सुरू होणाऱ्या श्रेणीतील उत्पादनेही निवडू शकतात.

तंत्रज्ञान विभागात, लॅपटॉप्सच्या किंमती २५,९९० रुपयांपासून सुरू होत आहेत, तर स्मार्टफोन्स ७,४९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय, ग्राहक नवीनतम खऱ्या अर्थाने वायरलेस इयर बड्स केवळ ६९९ रुपयांत खरेदी करू शकतात आणि स्मार्ट वॉचेस केवळ १,३९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत.

तुमच्या पसंतीच्या ॲपल गॅझेट्सच्या खरेदीवरही तुम्ही उत्तम कॅशबॅक्स मिळवू शकता. एचडीएफसी कार्ड धारकांना ५२,६०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या आयफोन्सच्या २८,५०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या आयपॅड्सच्या व ७६,९०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या मॅकबुक्सच्या खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे. १९,९९० रुपयांपासून सुरू होणारे एअरपॉड्स, २६,४०० रुपयांपासून सुरू होणारी ॲप वॉचेस आणि ९०० रुपये किंमतीपासून मिळणाऱ्या ऑनलाईन ॲपल  ॲक्सेसिरीज या विभागात आहेत.

ग्राहक २४१९ रुपये किंमतीपासून सुरू होणारे मिक्सर्स व फूड प्रोसेसर्स, ६९९ रुपये किंमतीपासून सुरू होणारे सॅण्डविच मेकर्स व टोस्टर्स, कॉफी मेकर्स व केट्ल्स खरेदी करू शकतात. चिमनी व हॉब्जच्या किंमती २,२८४ रुपयांपासून सुरू होत आहेत, तर मायक्रोवेव्ह्ज व ओटीजी व एअर फ्रायर्सच्या किंमती अनुक्रमे ३८९९ रुपये व ३९९० रुपयांपासून सुरू होतात. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त अशा मसाजर्स, ज्युसर्स/ब्लेण्डर्स व वॉटर प्युरिफायर्स यांच्या किंमतीही अनुक्रमे २१४९, ७७९ व ५५०० रुपयांपासून सुरू होत आहेत.

ग्राहक, आपल्या घरातील मनोरंजनाच्या सुविधांना नवीन रूप देण्यासाठी, ७,९९० रुपये किंमतींपासून उपलब्ध होणारे सर्वाधिक विक्रीचे टेलीव्हिजन्स तसेच अनुक्रमे ३,४९९ व १७,३९९ रुपये किंमतीपासून उपलब्ध असलेल्या होम ऑडिओ सिस्टम्स व प्रीमियर स्पीकर्सही, खरेदी करू शकतात.

नवीन वर्षांत आपले रूप बदलू इच्छिणाऱ्यांसाठी ट्रिमर्स, हेअर ड्रायर्स व हेअर स्टायलर्स यांसारखी ग्रूमिंग व स्टायलिंग उत्पादने ५४९ रुपयांपासून उपलब्ध आहेत.

विजय सेल्समधून खरेदी करण्याचा आणखी एक लाभ म्हणजे मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्राम होय. या योजनेद्वारे ग्राहकांनी स्टोअर्समधून तसेच विजयसेल्सडॉटकॉमवरून केलेल्या खरेदीसाठी त्यांना ०.७५ टक्के लॉयल्टी पॉइंट्स दिले जातात. स्टोअरमध्ये रिडम्प्शन करताना प्रत्येक पॉइंट म्हणजे एक रुपया धरला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post