दिवा/आरती मुळीक परब: कल्याण ग्रामीणचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या दिव्यातील आमदार कार्यालयाचे चंद्रांगन रेसिडेन्सी येथे गेल्या वर्षी मार्चमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले होते.
या कार्यालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त दिवा शहर मनसे कडून सामाजिक भावना जपत दिव्यातील अपना घर या वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना कपडे आणि जेवणाचे वाटप करण्यात आले. सोबतच या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत म्हणून आमदार राजू पाटील यांच्या मासिक वेतानातून ५० हजार रुपयांचा धनादेश संस्थेच्या ट्रस्टींकडे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी दिवा मनसेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र