डोंबिवली / शंकर जाधव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांसंदर्भात काढलेल्या अपशब्दाचा शिवसेना व भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.
राज्यात ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्रा काढण्यात डोंबिवलीत रविवारी यात्रा काढण्यात येणार आहे व या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना आणि भाजपने डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, राहुल दामले,नंदू जोशी, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे, महेश पाटील ,जतिन पाटील, संदेश पाटील, वैभव राणे यांसह अनेक पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधान सभा मतदार संघात 2 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता ही रॅली काढण्यात येईल. ही रॅली फडके रोड येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीत भाजपचे मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. सावरकरांना भारत रत्न द्यावा अशी मागणी या रॅली दरम्यान करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे दिपेश म्हात्रे आणि भाजपचे शहर अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.