डोंबिवली / शंकर जाधव : स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख पदी भाई पानवडीकर तर उपशहर प्रमुख डोंबिवली पूर्वपदी विशाल शेटे यांची नियुक्ती करण्यात आली. उपनेते अध्यक्ष ग्राहक संरक्षण कक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया कन्स्यूमर फोरम उपनेते ॲड. अरुण जगताप यांच्या हस्ते शेटे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी शेटे म्हणाले, स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करू तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन असे सांगितले.