डोंबिवली / शंकर जाधव : जाह्णवी मल्टी फाउंडेशन डोंबिवलीच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील जन गण मन शाळेत श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमानजी,लव कुश आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ढोल ताशामध्ये अश्व रथातून सदृश्य आगमन झाले.
ज्ञानेश्वरीवर पीएचडी केलेल्या डॉ. अनुराधा सुधीर कुलकर्णी, ब्रह्मकुमारीचे माउंटअबू वरून खास उपस्थित असलेले डॉ.कुमार वैद्य, चारुलता गुजराती , नरेंद्रजाधव असे अनेक मान्यवर या राज्याभिषेक सोहळ्यास दोनशे कलावंत आणि विद्यार्थी पालक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष महावीर बडाला , उपाध्यक्ष शंकर जाधव, सचिव प्रशांत जोशी, खजिनदार सोनल सावंत यांसह सदस्य अंकिता केळकर आदी उपस्थित होते.
प्रभू श्रीरामचंद्र यांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत नाट्यरूपात सादर करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच आपला छंद जोपासला पाहिजे आणि डिजिटल डॉट्स ही संकल्पना ही मांडली. रोज सायंकाळी सात ते आठ आपण सर्वांनी दूरदर्शन आणि भ्रमणध्वनी म्हणजेच डिजिटल वर्ल्ड पासून दूर राहावे म्हणजेच त्याचा वापर एक तासासाठी करूच नये आणि या वेळात आपला छंद जोपासावा असे सांगितले. भविष्यात संस्थेत असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील जसे सम्राट अशोक, महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित ही कार्यक्रम घेतले जातील असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची संकल्पना जाह्णवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जाह्णवी राजकुमार कोल्हे यांची होती आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई , प्रमोद पगारे आणि सर्व जेएमएफ परिवारातील सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाली.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.