भाजपचे युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश केळशीकरांचे दिवा प्रभाग समितीच्या आयुक्तांना निवेदन
दिवा / आरती मुळीक परब : दिवा पश्चिम विभागातील गेले अनेक वर्ष एन. आर. नगर, नागवाडी, क्रिश कॉलनी, बालदा नगर, बामन वाडा, बंदरआळी या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असून ती समस्या नागरिक कित्येक वर्षे सहन करत आहेत. एन.आर. नगर, नागवाडी, क्रिश कॉलनी, बालदा नगर, बामन वाडा, बंदरआळी या भागातील पिण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठाणे शहर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश केळशीकर, ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य विजय भोईर, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, ओबीसी मंडळ अध्यक्ष रोशन भगत, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, मंडळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे व इतर कार्यकतें या सर्वानी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्याशी इतर समस्यांबाबत चर्चा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे विनंती केली.
तसेच प्रीतम पाटील यांनी पाणी समस्येसारखा गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.