उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दर्शन सोहळ्याचे आयोजन
दिवा / आरती मुळीक परब: दिवा शहरात शिवसेनेच्यावतीने शुक्रवार दिनांक २१ एप्रिल रोजी एकविरा देवीचे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहरप्रमुख तथा उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या दर्शन सोहळ्यात दिवा शहरातील हजारो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सकाळी आठ वाजता तब्बल ५० बस व अनेक खाजगी गाड्यांमधून निघालेल्या सर्व महिला अकराच्या सुमारास कार्ला येथे पोहचल्या. खास महिलांसाठी उभारल्या गेलेल्या भल्या मोठ्या मंडपात क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर सर्व महिलांनी देवीच्या गडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेतले.
शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी, माजी नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, शहर अधिकारी युवती सेना साक्षी मढवी यांनी स्वतः सर्व महिलांसोबत गडावर जाऊन एकविरा आईचं दर्शन घेतल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला बघायला मिळाला. दर्शन झाल्यानंतर महिलांची उत्तम जेवणाची सोय करण्यात आली व त्यांनंतर महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमात उपस्थित महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. ह्या कार्यक्रमात महिलांना सोन्याची नथ, पैठणी व इतर अनेक बक्षिसं जिंकण्याची संधी उपल्बध करून देण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशहर प्रमुख गणेश मुंडे, नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, सुनीता मुंडे, माजी नगरसेवक दिपक जाधव, शहर अधिकारी युवती सेना साक्षी मढवी, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, विनोद मढवी, उपविभाग प्रमुख सचिन चौबे, जगदीश भंडारी, राजेश पाटील, सदाशिव पाटील, शरद पाटील, तुकाराम मुंडे, शाखाप्रमुख निलेश म्हात्रे, गणेश गायकवाड, संतोष देसाई, राजेश पाटील, जयदास शेलार, महेश पाटील, मनोज खंडागळे, भूषण पाटील, शिवदास पाटील, सुरेश पाटील, प्रशांत कदम, धीरज देशमुख, राकेश म्हात्रे, केशव पाटील, सोपान म्हात्रे, रुपेश मढवी, रंदीप मढवी, संजय म्हात्रे, संजय भगत, विठ्ठल घेवडे, शंकर म्हात्रे, अरुण म्हात्रे, विजय भोईर आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यावेळी माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका दिपाली भगत, उपशहरप्रमुख अँड. आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, गुरुनाथ पाटील, निलेश पाटील, शैलेश भगत, अर्चना पाटील, अँड.सुप्रिया भगत, भाग्यश्री पाटील आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते. शिवसेना दिवा शहराच्यामुळे आई एकविरा देवीचं दर्शन झाल्यामुळे अनेक महिलांनी रमाकांत मढवी व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.