फेरीवाल्यांवर काही ठिकाणी प्रशासनाकडून कानाडोळा


  शहर फेरीवाला कमिटीची मिटिंग होत नसल्याने नाराजी

डोंबिवली / शंकर जाधव :  डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे असे मनसे आमदार प्रमोद ( राजू)पाटील यांच्याकडून पालिका प्रशासनाला सांगण्यात आले.20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले असून डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.याबद्दल डोंबिवलीकर मनसेचे आभार मानत आहे.मात्र काही फेरीवाले नियमांचे उल्लंघन करून पालिका कर्मचारी काही वेळाकरता कार्यालयात गेल्याची संधी साधून पुन्हा बसतात.

मात्र हे हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच फेरीवाले बसत असल्याने डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पथक प्रमुख बदलीची मागणी केली आहे.'फ' प्रभाग क्षेत्रातील स्टेशन परिसर फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई होत असल्याने येथे फेरीवाले बसत नाही.याउलट 'ग'प्रभाग क्षेत्राच्या हद्दीतील स्टेशन परिसरात काही प्रमाणात फेरीवाले बसत असल्याने येथील पथकप्रमुख व कर्मचारी फेरीवाल्यांवर का कारवाई करत नाही असा प्रश्न मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष घरत यांनी उपस्थित केला आहे.कमी मनुष्यबळ असल्याची सबब पुढे करून कानाडोळा होत असेल तर अश्या कर्मचार्यांवर व पथकप्रमुखांना पालिका आयुक्तांनी जाब विचारणे गरजेचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.तर दुसरीकडे 'फ'प्रभाग क्षेत्रातील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिसत असल्याने सहायक आयुक्त भरत पाटील, पथकप्रमुख अरुण जगताप यांसह पथकातील कर्मचारी यांचे नागरिक कौतुक करत आहे.

 काही दिवसांपूर्वी मनसे शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आली.त्यावेळी पालिका आयुक्तांनी उपायुक्त स्वाती देशपांडे यांना फेरीवाला प्रश्नांसंदर्भात शहर फेरीवाला कमिटीची मिटिंग बोलाविण्याचे निर्देश दिले होते.मात्र अद्याप देशपांडे यांनी मिटिंग का बोलावली नाही असा प्रश्न मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष घरत यांनी उपस्थित केला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post