आयएसपीएल संघ जिजाऊ चषकाचा मानकरी

 


डोंबिवली / शंकर जाधव :  जिजाऊ महोत्सवानिमित्त संपूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यात अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी देखील या महोत्सवाचे आयोजन विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ नगरीत करण्यात आले होते. यावेळी रंगलेल्या कबड्डी स्पर्धेत जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राज्यभरातील १२ व्यावसायिक संघांनी सहभाग घेतला होता.

उपांत्य फेरीत जॉय कुमार ठाणे (१३ गुण) व भारत पेट्रोलियम (३८ गुण) यांच्या मध्ये एकतर्फी लढतीत २५ गुणांनी विजय संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत आय एस पी एल (४९गुण) विरुद्ध ठाणे महानगरपालिका (१८ गुण) मिळवत आय एस पी एल संघाने ३१ गुणांनी विजय मिळवत फायनल मध्ये प्रवेश केला. जिजाऊ चषकाचा अंतिम सामना आय एस पी एल युवा पलटण (४५ गुण) व भारत पेट्रोलियम (४० गुण) यांच्या मध्ये शेवट पर्यत रंगला त्यामध्ये ५ गुणांनी युवा पलटण संघाने बाजी मारली खरंतर या सामन्यांमध्ये अस्लम इनामदार याने दर्जेदार खेल दाखवत आपला दर्जा दाखवून दिला अस्लम इनामदार ला मालिकावीर म्हणून बाईक देण्यात आली तर आकाश मुंडे यास उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून (फ्रिज) रेफिरजरेटर देऊन गौरविण्यात आले. तर लकी ड्रॉ कुंपनद्वारे भाग्यवान प्रेक्षकाला सायकल देण्यात आली व बाकी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

युवा पलटण संघाला प्रथम पारितोषिक ३,३३,३३३ रुपये, भारत पेट्रोलियम संघाला द्वितीय पारितोषिक २,२२,२२२ रुपये तर जॉयकुमार ठाणे व ठाणे महानगरपालिका या दोन संघाना प्रत्येकी ७७,७७७ रुपये देण्यात आले. तसेच खास आकर्षण म्हणून महिलांचे कबड्डीचे सामने झाले त्यामध्ये जी के पष्टे प्रतिष्ठान पालघर (४१ गुण) विरुद्ध प्रो ऑलम्पिया मुंबई (९गुण) यांच्या मध्ये सामना झाला त्या मध्ये ३२ गुणांनी पालघर संघाने विजय मिळवला.

Post a Comment

Previous Post Next Post