मनसैनिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
डोंबिवली / शंकर जाधव : पूर्वेकडील गोपाळनगर २ मधील मोकळ्या जागेत आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.या जागेत रिकल्या आंब्याच्या पेटी व गवत ठेवले जात होते.या पेटींना व गवताला आग लागल्याने सांगण्यात आले.या जागेच्या बाजूला ट्रान्सफार्मस असल्याने त्यालाही आग लागल्याची शक्यता होती.मात्र पुढील धोका ओळखून मनसेच्या माजी नगरसेविका मंदा पाटील व मनसैनिक गणेश मगरे, सचिन मयेकर, संजय जाधव यांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.तात्काळ अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली.दरम्यान डोंबिवलीतील अनेक ट्रान्सफार्मरला लागून कचरा आणि लाकडी समान ठेवले जाते.याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन ट्रान्सफार्मसजवळ कचरा व लाकडी वस्तू टाकण्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.