तीन वर्षाच्या चिमुरडीला तासाभरात केले आईवडिलांच्या स्वाधीन

 


दक्ष नागरिकांसह पोलिसांची दमदार कामगिरी 

डोंबिवली / शंकर जाधव :  आई वडिलापासून दुरावलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीला पोलिसांनी  केवळ तासाभरात तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिल्याची घटना कल्याण पश्चिमेकडे घडली आहे

कल्याण पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण मैदानाजवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे अमोल खत्री आणि त्यांचे काही मित्र गप्पा मारत बसलेले असताना त्यांना एक छोटी मुलगी रस्त्याने एकटीच रडत जात असल्याचे दिसून आले. या मुलीला त्या तरुणांनी थांबविण्याचा  प्रयत्न केला.  घाबरलेली ती चिमुकली  पळून जाऊ लागली.  यामुळेच  या तरुणांनी या मुलीला पकडत महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी मुलगी सापडलेल्या परिसरात तिच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात या मुलीची आई आणि मामा आपल्या मुलीला शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी त्यांची ओळख पटवत या चिमुरडीला सुखरूप आई वडिलांच्या ताब्यात दिले. बऱ्याच वेळाने आई दिसताच ही चिमुकली आईला बिलगली. आई आणि मुलगी एकमेकांना भेटतच सदरची महिला त्या मुलीची आई असल्याची पोलिसांना खात्री पटली. तर पोलिसांनी प्रसगावधान राखत चिमुकलीला पोलिसा पर्यंत पोचविणार्या तरुणाचे कौतुक केले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post