मुसळधार पावसात रिक्षाचालकांकडून लूट

 

परिवहन उपक्रमाकडून वेळेवर बस सेवा

डोंबिवली ( शंकर जाधव ) मुसळधार पावसामुळे काही वेळ रेल्वे सेवा ठप्प झाली होती.प्रवासी वर्गाने घरी पोहोचण्यासाठी रिक्षाने प्रवास करणे पसंत केले मात्र वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत नेहमीप्रमाणे रिक्षाने लूट सुरू केली होती. तर काही रिक्षाचालकांनी जवळील भाडे नाकारल्याने नागरिक संतप्त झाले होते.  केडीएमटीकडून कल्याणच्या दिशेने पाच, दावडी व मिलापनगर बस सोडल्या होत्या. मात्र इतर दिवसांपेक्षा जास्त प्रवासी वर्ग असल्याने बसेसमध्ये गर्दी झाली होती. तर बसची प्रतिक्षा करताना प्रवासी वर्गाची लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मात्र काही प्रवासी परिवहन उपक्रम व रिक्षाचालकांवर नाराज झाले होते.तर रुत्तम पाटील हे प्रवाश्यांना रिक्षा मिळावी याकरता मदत करत होते.



Post a Comment

Previous Post Next Post