विद्यार्थ्यांना निवास सुविधा शोधणे होणार सोपे

 



 एआय-आधारित उत्पादन स्टुडंटअकॉमोडेशनजीपीटी.एआय लॉन्च 

मुंबई : युनिव्हर्सिटी लिव्हिंग या आघाडीच्या जागतिक स्टुडंट हाऊसिंग (विद्यार्थी निवास) प्लॅटफॉर्मने विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार सर्वोत्तम निवास शोधण्यास सक्षम करण्याकरिता नवीन एआय-केंद्रित टूल स्टुडंटअकॉमोडेशनजीपीटी.एआय लाँच केले आहे. निवास शोधण्याची त्रासदायक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले नवीन लाँच केलेले टूल विद्यार्थ्यांना काही मिनिटांमध्येच योग्य निवास सुविधा शोधण्यामध्ये मदत करेल, त्यांना अनेक उपलब्ध पर्याय दाखवेल. एआय टूल विद्यार्थ्यांना निवासासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यापूर्वी त्यांच्या पसंतीचे स्थान, बजेट व इतर गरजा विचारात घेईल, ज्यामुळे प्रक्रिया एकसंध आणि सोयीस्कर होईल.

युनिव्हर्सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक सौरभ अरोरा म्हणाले, "आम्हाला विद्यार्थी निवास उद्योगामधील गेम-चेंजर म्हणून स्टुडंटअकॉमोडेशनजीपीटी.एआय सादर करण्याचा आनंद होत आहे. युनिव्हर्सिटी लिव्हिंग विद्यार्थ्यांना एकसंध व वैयक्तिकृत अनुभव देण्याप्रती, घरापासून दूर परिपूर्ण निवास शोधण्याची प्रक्रिया सुलभ करण्याप्रती कटिबद्ध आहे. एआयच्या क्षमतेसह आमचा विश्वास आहे की, आमचे नवीन टूल विद्यार्थ्यांच्या योग्य निवास शोधण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करेल."

हे टूल विद्यार्थ्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करते आणि किफायतशीर, आरामदायी निवास शोधण्यासाठी हा वैयक्तिकृत सर्च बार आहे. एआय व्यासपीठ विद्यार्थ्यांना बुकिंग प्रक्रियेत देखील साह्य करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुलभपणे त्यांचा तात्पुरता निवास शोधता येईल. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचा बहुमूल्य वेळ व त्रासदायक शोध प्रक्रियेत मदत करण्यासाठी हे टूल त्यांना कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून काही मिनिटांमध्येच विशिष्ट शहरामधील निवासाचा खर्च शोधण्याची सुविधा देते. कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॅल्क्युलेटर व्यक्तीच्या खर्च सवयींनुसार वैयक्तिकृत बजेट देते.

Post a Comment

Previous Post Next Post