डोंबिवली ( शंकर जाधव ) पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक पालिका प्रशासनाचा नावाने बोटे मोडत आहे.काही रस्त्यांवर खड्डे यमदूत बनले असून वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे.वास्तविक पालिका प्रशासनाने याची काळजी घेत खड्डे बुजवणे आवश्यक असताना अजूनही काही महत्त्वाचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाही.
मात्र पालिकेवर विसंबून न राहता अपघात टाळण्यासाठी डोंबिवलीतील वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत खड्डे बुजवले.डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवताना वाहतूक पोलिसांनी अथक मेहनत घेतली.वपोनि उमेश गित्ते, पोलीस नाईक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार अजय किरदत,वाँर्डन निलेश भेमसे, हकीम तडवी, सुनील जगताप आणि शशिकांत चौधरी यांनी खडी टाकून खड्डे बुजवले.वाहतूक पोलिसांच्या या समाजकार्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
Tags
महाराष्ट्र