ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग

 


  • मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट 
  • पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
  • ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले 

ठाणे :  काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचे दिसून आले. ठाणें शहरात सोमवार सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामावर जाणार्‍या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे टाइम टेबलवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आला.  मंगळवारी सकाळी साडेचारपासून ते साडेआठपर्यंत जवळपास 70 मिलिमीटर पाऊस झाला. मागील 24 तासात 108 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.  या जोरदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या वर्षी याच काळात 1285 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, 21 जुलैपर्यंत ठाणे आणि रायगडात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

  पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली आणि चंद्रपुरात पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुसळधार झालेल्या पावसाने भास्कर कॉलनी, गोडबोले हॉस्पिटल, वंदना एसटी स्टॅण्ड, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, डेबोनिअर सोसायटी, आदी ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, आज उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मोहने, जांभूळ आणि बदलापूर या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगडातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून कुंडलिका व पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 आज दिवसभरात ठाणे जिल्ह्यात 61.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये 62.4 मिमी इतका सर्वाधिक पाउस झाला आहे तर सर्वात कमी मुरबाडमध्ये 30.7 मिमी इतका पाउस झाला आहे. त्यानंतर ठाणे 53.5 मिमी, कल्याण 55.00 मिमी, भिवंडी 43.5 मिमी, उल्हासनगर 57.8 मिमी इतका पाऊस झाला आहे.  दरम्यान, दिवसभराच्या पावसाने ठाणे, रायगड आणि पालघरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी, रायगडातील कुंडलिका व पाताळगंगा धोक्याच्या पातळीवर असल्याने शासनाच्यावतीने अलर्ट जारी करण्यात आले आहे. 

 


Post a Comment

Previous Post Next Post