शिवसेने घेतली आयुक्तांची भेट
डोंबिवली ( शंकर जाधव ) चोळेगाव शिवमंदिर जवळील स्मशान भूमीच्या दुरावस्थेबद्दल स्थानिक नागरिकांनी शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख अमित प्रताप बनसोडे यांना माहिती दिली होती.याबाबत बनसोडे यांनी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या निर्दशनास आणली. मोरे यांच्या यांच्या आदेशानुसार बनसोडे आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. पालिका आयुक्तांना सदर स्मशानभूमीच्या दुरावस्थेची माहिती देत निवेदन दिले. स्मशानभूमीची पत्रे सडले असून मृतदेह ठेवण्याची लोखंडी जाळी सडली, पिण्याच्या पाण्याची सोय नाही या अशा अनेक समस्या असल्याने नागरिक नाराज झाले आहे..पालिका आयुक्तांनी चोळेगाव शिवमंदिर जवळील स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल संबधित विभागाला निर्देश देत चोळेगाव येथील स्मशानभूमीच्या दुरुस्ती करण्यासाठी निर्देश दिले. मनोज गिरी, ज्ञानेश्वर राठोड,विजय आंबोकर,योगेश महाजन होते.या स्मशानभूमीत पालिकेने एक सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी करण्यात आली.