कराची: तोशखाना प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे इमरान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने हा संविधानाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात ५ ऑगस्ट रोजी ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच इम्रान खान यांना १ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला होता, त्याचबरोबर त्यांना ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. लाहोरमधल्या जमान पार्क येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून इम्रान खान अटक येथील तुरुंगात कैद आहेत.
इम्रान खान यांनी ट्रायल न्यायालयेच्या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर निर्णय देताना इस्लामाबाद न्यायालयाने म्हटले आहे की, तोशखाना प्रकरणात ट्रायल न्यायालयाने इम्रान खानला दिलेली शिक्षा हा न्यायाधीशांचा पक्षपाती निर्णय होता. हा निर्णय न्यायाची चेष्टा करण्यासारखे आहे. इमरान खानला तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, इम्रान यांची त्यांना अट्टकहून रावळपिंडीच्या आदियाला तरुगांत हलवण्यात यावे, अशी इच्छा असल्याचे इम्रान खानच्या वकिलांनी न्यायाधीशासमोर आपले म्हणणे मांडले.
दरम्यान, इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, तुरुंगातून बाहेर पडल्यावर इम्रान खान यांना दुसऱ्या कुठल्या प्रकरणात पुन्हा कैद केलं जाऊ नये. मात्र खान यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत, ज्यापैकी दोन प्रकरणं अशी आहेत, ज्यामध्ये तपास यंत्रणा इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.