डोंबिवलीत आमदार मंगेश चव्हाण यांचा जाहीर सत्कार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : उत्तर महाराष्ट्र विकास परिषद , खान्देश हित संग्राम यांच्या वतीने डोंबिवलीतील ब्राह्मणसभेत चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरिक सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी माझ्या मातीतील लोकांनी माझा सत्कार केल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विकास परिषद अध्यक्ष महेंद्रसिंग बापू राजपूत, खान्देशहितसंग्राम अध्यक्ष सुजित महाजन यांसह प्रदीप चौधरी, प्रमोद महाजन, एकनाथ चौधरी, डोंगर सिंग, गदरी आप्पा, प्रेम पाटील, सुमेर सिंग राजपूत, विकास पाटील, मोहन पाटील,नंदू पाटील, किशोर महाजन, नाना देवकर, मयूर पाटील, प्रशांत महाजन, बापू हाटकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, खान्देशी माणसाकडे प्रेमाचा ओलावा असतो.आता संघर्ष करून स्वतःच अस्तिव निर्माण करा.मी माझ्या मातीत कर्तृत्व गाजवतोय. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांनी मागणी मांडल्या.आता लोकांनी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. त्यासाठी मेरिट महत्वाची असून एकसंघ राहिल्यास राजकीय वाटाही मिळेल. येणाऱ्या काळात गमिनी कावा करा.आपली मानस पुढे आली पाहिजे.मेरिट पटवून दिले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण नक्कीच मान्य होतील.माझ्या मातीतील लोक माझा सत्कार करताय याचा मला आनंद होतोय.आता पुढे जात असताना आपल्या लोकांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे.
मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला.खर तर येणाऱ्या काळात तुमच्या आशीर्वादाने राजकीय ताकद उभे राहते. रवींद्र चव्हाण म्हणाले, आपण सर्वजण गुण्यागोविदाने राहतो. त्या भागातील मंगेश चव्हाण हे नेतृत्व असून योग्य प्रकारे निर्णय घेतात.आमची सर्वांची कर्मभूमी डोंबिवली आहे.आपल्या सुखदुःखातएकत्र काम करतोय., विश्वासाने काम करुण अनेक वर्षे जपतोय, संभाळतोय.आपण एक ऋणानुबंध एक नात्याने जोडलेले आहोत.आपल्या नासानसात अखंड हिंदुत्व भरले आहे. एकत्र येऊन एक विकासाची जोड देण्याचा प्रयत्न करत आहे.प्रदेश व व्यवस्था येणाऱ्या काळात विकसनशील देशाचा भाग असेल. आपल्या सर्व मानसिकता, दिशा त्याकडे नेणे आवश्यक आहे.देशाच्या भविष्यासाठी आपलं योगदान काय असेल ते ठरवलं पाहिजे.आपण सर्व जण येणाऱ्या काळात त्या दिशेने जाणे आवश्यक आहे.सर्वांना देशांना महासत्ता करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विकास परिषद अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत यांनी थोडक्यात माहिती दिली.यावेळी भाजप डोंबिवली पूर्व महिला आघाडी सचिव मीना अहिरे व राजेंद्र अहिरे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.