मध्य रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक

राज्यातील आठ रेल्वेगाड्या रद्द

मुंबई: मध्य रेल्वेकडून पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागात दोन दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा पॉवर ब्लॉक ३० ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजेपासून ते ३१ ऑगस्टला दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून तब्बल आठ रेल्वेगाड्या तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १४ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍याची माहिती रेल्‍वे प्रशासनाकडून देण्‍यात आली होती, त्‍यापैकी सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत.

 अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्‍वे स्‍थानकानजीक लांब पल्‍ल्‍याच्‍या लूप मार्गासाठी वाहतूक आणि पॉवर ब्‍लॉक घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकात पॉवर ब्‍लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्‍ल्‍याच्‍या लूप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वीच रेल्वेने मेगाब्लॉकमुळं १४ रेल्वेगाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु पॉवरब्लॉकमुळे यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या रेल्वेंच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पॉवरब्लॉक काळात काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस फक्त अकोला स्टेशन पर्यंत धावणार असल्याची माहिती आहे. तर नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेस ही रेल्वे अकोल्याहून धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली आहे. 

कोणत्या रेल्वेगाड्या रद्द असतील?

१. लोकमान्‍य टिळक-बल्‍लारशाह एक्‍स्‍प्रेस (२९ ऑगस्‍ट)

२. बल्‍लारशाह-लोकमान्‍य टिळक एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट)

३. भुसावळ-वर्धा एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट)

४. वर्धा-भुसावळ एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट)

५. पुणे-अमरावती एसी एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट)

६. अमरावती-पुणे एसी एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट)

७. भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर (३१ ऑगस्‍ट)

८. बडनेरा-भुसावळ एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट)

यापूर्वी रद्द करण्‍यात आलेल्‍या सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत, त्‍यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १२१३६ नागपूर-पुणे एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), पुणे-नागपूर एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), १७६४१ काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट) आणि १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेसचा (३० ऑगस्‍ट) समावेश आहे. काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस अकोलापर्यंत धावणार आहे, तर नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेस अकोला येथून सुटणार आहे, अशी माहिती मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाकडून देण्‍यात आली आहे.

Tags : #मध्य रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक # राज्यातील आठ रेल्वेगाड्या रद्द # मूर्तिजापूर रेल्‍वे स्‍थानकानजीक पॉवर ब्लॉक #

Post a Comment

Previous Post Next Post