ज्येष्ठ नागरिकांनी मानले शिवसेनेचे आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ) :
ठाकूर्ली येथील नागरिकांची बऱ्याच वर्षाची मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या कानावर घातल्यानंतर खासदार साहेबांनी त्वरित रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करून ठाकुर्ली पूर्व विभागातील नागरिकांसाठी सरकत्या जिन्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाने शिवसेनेचे आभार मानले.
सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा आज डोंबिवलीचे शिवसेना शहरप्रमुख माननीय श्री राजेश मोरे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर लोकार्पण सोहळ्याच्या वेळी डोंबिवली शहर प्रमुख व सरकत्या जिन्याच्या लोकार्पण सोहळ्या कार्यक्रमाचे उद्घाटक राजेश मोरे यांचेसोबत उपशहर प्रमुख दीपक उर्फ बंड्या भोसले, शहर संघटक ज्ञानेश पवार, प्रकाश सागरे, उप कार्यालय प्रमुख शैलेंद्र भोजने, डोंबिवली पूर्व विभागा विभाग महिला आघाडी अध्यक्षा स्वाती हिरवे, महिला उपशहर संघटक कल्याणी वर्तक, खासदार रेल्वे समन्वय समितीच्या अध्यक्षा स्वाती मोहिते, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र कांबळे, शिवसैनिक मनोहर शिंदे, शाखाप्रमुख अर्जुन भाटी, सुभाष कआंबइरए, कार्यालय प्रमुख प्रकाश शांताराम माने, स्टेशन मास्तर पिंटो , शिवसैनिक व ठाकूर्ली विभागातील नागरि सहभागी झाले होते.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आगे बढो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देऊन ठाकुर्ली स्टेशनचा परिसर उपस्थितांनी दुमदुमून सोडला.