डोंबिवली ( शंकर जाधव ) : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आल्यावर भिजलेली लाकडे, गळक छप्पर पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत.स्मशानभूमी मध्ये पावसाचे पाणीवरून गळत असल्याने तसेच तेथे ठेवलेली लाकडे भिजत असल्याने शव जाळण्यासाठी डिझेलचा फारच वापर करावा लागतो. ही अवस्था डोंबिवली पश्चिमेकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीची आहे.
पश्चिमेकडे नागरिक शव घेऊन या स्मशानभूमीत येत असतात.मात्र येथे समस्या पाहून नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात.या स्मशानभूमीच्या दुरावस्थेचा समाजसेवक जितेंद्र अमोणकर यांनी सामाजिक माध्यमात विडिओ व्हायरल केला आहे.यावर अनेकांनी प्रशासनावर तशोरे ओढले आहेत.तर कर्मचारी वर्ग अपुरा असल्याची वास्तविकता समोर आली आहे. स्मशानभूमीचे छप्पर गळके असून त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसते. दरम्यान, याकडे अनेक वर्षांपासून सत्ताधारी व विरोधा पक्षाने लक्ष दिले नाही.