मुंबई: मुंबईत येत्या १ सप्टेंबरपासून दूध महागणार आहे. म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये प्रति लिटर २ ते ३ रुपयांनी महागणार आहे तर होलसेल दरातही २रुपयांची वाढ होणार आहे. शनिवारी दूध विक्रेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या म्हशीच्या सुटे एक ८५ रुपये लिटर आहे. याता हा दर ८७ रुपये होईल, तर रिटेलला हे दूध ८७ ते ८८रुपये लिटर दराने मिळेल. नवे दर १ सप्टेंबरपासून लागू होतील.
दूध संघाच्या बैठकीनंतर संघाचे कार्यकारी सदस्य सीके सिंह यांनी सांगितले की, जनावरांचा चारा व खाद्य दरात २० टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. त्यामुळे दूर दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरांचा सहा महिन्यानंतर पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.
गेल्या जवळपास महिनाभरापासून राज्यात पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झाला आहे. अनेक भागात चारा टंचाई निर्माण झाल्याने याचे दर वाढले आहेत.