डोंबिवली ( शंकर जाधव ) : नशेसाठी कफ सिरपच्या बाटल्या विकणाऱ्या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी काही तरुण नशेसाठी कफ सिरप विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्यांच्याकडे कफ सिरपच्या बाटल्या सापडल्या.दोनच दिवसापूर्वी भिवंडी येथून याच कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्याची कारवाई भिवंडी पोलिसांनी केली होती. त्यामुळे कल्याणमधील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे कनेक्शन भिवंडी प्रकरणाशी आहे का यादिशेने पोलीस तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान शेख आणि शौकत शेख अशी या अटक केलेल्यांची नावे आहे. या दोघांकडून पोलिसांनी इस्कूप नावाच्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.नशेकरीता या कफचा वापर केला जातो. जप्त करण्यात आलेल्या कफ सिरपच्या बाटल्या विक्री करण्यावर बंदी आहे. कल्याण स्टेशन परिसरात नशेखोरांचा वावर असतो. कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी काही तरुण नशेसाठी कफ सिरप विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्यांच्याकडे कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कफ सिरफच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. या कफ सिरपच्या बाटल्या नशेसाठी विकल्या जात होता. एक बाटली पूर्ण पिल्याने नशा येते. नशेकरीता या कफचा वापर केला जातो. जप्त करण्यात आलेल्या कफ सिरपच्या बाटल्या विक्री करण्यावर बंदी आहे. तरी देखील या कफ सिरपच्या बाटल्या या दोन आरोपींनी कूठून आणल्या. त्यांना त्या कशा उपलब्ध झाला. त्यामागे मोठे रॅकेट आहे याचा पोलीस तपास करीत आहे. दोघांबरोबर साथीदारही पसार झाला. तो देखील याच कफ सिरपच्या बाटल्या विकत होता. पोलीस तो पोलिसांना पाहताच पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस निरिक्षक प्रदीप पाटील यांनी दिली आहे.