डोंबिवली ( शंकर जाधव ) : प्रत्येक विद्यार्थी शिकला तर देशाला महासत्तेकडे जाण्यास कोणीही रोखू शकणार नाही. आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत केली जाते. शिवसेना नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे असते असे शिवसेना डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण यांनी सांगितले.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमांतून विभागप्रमुख अनिल म्हात्रे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विभागप्रमुख अनिल म्हात्रे व कल्याण ग्रामीण उपतालुका संघटक संगीता म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली गाव येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण,कल्याण ग्रामीण तालुका संघटक बंडू पाटील, माजी नगसेवक रवी पाटील, पांडुरंग चव्हाण यांसह यावेळी उपविभाग प्रमुख अरविंद वत्रे, उपतालुका प्रमुख उमेश पाटील, तुकाराम म्हात्रे, सुहास गुरव, निरज म्हात्रे, राहुल शेटे, आदि उपस्थित होते. यावेळी अनिल म्हात्रे म्हणाले, सुमारे ३५० गरजू विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले. तर अरविंद वत्रे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे गरीब विद्यार्थांसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या माध्यमातून नांदिवली गावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रिया यादव, प्राची परब, अस्मिता म्हात्रे, अर्चना रायसिंग, स्नेहा कविटकर, चेतना विनेरकर, नयना कार्लेकर यांनी अथक मेहनत घेतली.