मुंबई - गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन आणि कोकण विकास समिती यांच्यातर्फे मुंबई गोवा महामार्ग दिरंगाई प्रश्नांवर डोंबिवलीतील जिमखाना सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमवेत खुले चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंत्री चव्हाण यांनी प्रत्येक कोकणवासीय माझ्या पाठीशी असून माझ्याकडे आता संधी आहे,

मुंबई - गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे असल्याचे सांगितले. या चर्चासत्रात सभागृहात कोकणवासीयांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी केली होती. महामार्गाचे काम वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न करणारे काका कदम, जयवंत दरेकर, याचिकाकर्ते अॅड ओवेस पेचकर, अक्षय म्हापदी , भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, संजय मोरे ,कोकणातील विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारीआदी मान्यवर उपस्थित होते. सामान्य नागरिकांपासून विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महामार्गातील पूर्णत्वासाठी प्रयत्न करणारे कोकणातील संघटनेच्या नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली.

मंत्री चव्हाण म्हणाले, मुंबई - गोवा महामार्गाचे काम होण्यासाठी सकारत्मक दृष्टीकोन दाखवा. महामार्गाचे काम होताना अनेक अडचणी आहेत. महामार्गाची एक लेन कोणत्याही परिस्थितीत १० सप्टेंबर्पयत सुरू होणार आहे. काम होणार नाही तर तुम्हाला फासावर चढविणार असे कोणी कसे बोलू शकतो. या सर्वगोष्टी श्रेयासाठी नाही. महामार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. खेळाडूवृत्ती मध्ये शेवटर्पयत जिंकण्यासाठी खेळायचा असते. मैदान सोडून जाण्याची तमा बाळगली नाही. खेळाडूवृत्तीप्रमाणे जिंकण्यासाठी खेळत आहोत. सर्वानी एकत्र येऊन कामांकडे लक्ष दिले पाहिजे. कारण मी हरलो तर कोकण हरेल, अशी भावनिक साथ मंत्री चव्हाण यांनी कोकणवासियांना घातली आहे.

   पुढे मंत्री चव्हाण म्हणाले, महामार्गाचे काम पूर्ण करण्यात अनेक अडचणी आहेत. गेल्या आठवडय़ात पाणी नव्हते. पाऊस सुरू होता. या कामासाठी सकारत्मक दृष्टीकोन ठेवा. सकारत्मक दृष्टीकोनाच आपल्या सर्वाना मार्ग दाखवेल. नकारत्मक दृष्टीकोनामुळे चांगल्या गोष्टी घडत नाही. एखादी गोष्ट कमी पडली तरी लगेच विचारणा करीत आहे. रस्ता व्हायला पाहिजे या दृष्टीकोनातून काम करीत आहे. मी त्यातील तज्ञ नाही पण तज्ञांशी बोलून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. 2009 पासून सभागृहात महामार्गाचे चौपदीकरण व्हावे यासाठी विषय मांडत आहे. दहा हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. माझ्याकडे आता संधी आहे त्यात काम करण्याचा प्रयत्न करत आहे . रस्त्याला मंजूरी देणारे दुसरे होते. बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय घेणारा दुसरे होते. कर्ज दुस:यांनी काढले आहे. 17 वर्ष काम झाले नाही असे बोलले जात आहे. हे काम न करणा:यांमध्ये रविंद्र चव्हाण नाही आहे. ज्यांच्याकडे अधिकार होते त्यांच्याक डून काम झाले नाही. कोकणाचा सुपुत्र म्हणून मी महामार्गाचे काम कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करीत आहे असे सांगितले.

      कोकणासारखे वैभव कुठे आहे का याचा तरी विचार करायला सुरूवात करा. मी मनातून रस्ता पूर्ण करायचा आहे ही खूणगाठ बांधली आहे. डिसेंबर्पयत रस्ता पूर्ण करणार असे ठरविले आहे. मला साथ हवी आहे. विधानसभेच्या सभागृहात महामार्गाच्या कामात आड येईल त्याला सोडणार नाही असे सांगितले आहे. कोणीतरी म्हणताना म्हणते गडकरी साहेब इकडे असे करतात तिकडे तसे करतात. देशात कुठे ही हतबल झाले नाहीत असे मंत्री चव्हाण म्हणाले.



Post a Comment

Previous Post Next Post