रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली'चा ५२ वा पदग्रहण सोहळा संपन्न

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवलीचा वार्षिक पदग्रहण सोहळा पूर्वेकडील रोटरी सेवा केंद्र सभागृहात संपन्न झाला. क्लबचे तात्काळ माजी अध्यक्ष रो. अनिकेत शिरकर यांनी क्लबचे सूत्र क्लबचे साल २०२३-२४ चे अध्यक्ष रो. मिहीर अरविंद कोचरेकर यांच्या हाती सोपवले. जिल्हा रोटरॅक्ट प्रतिनिधी (डी.आर.आर) रो. सुष्मिता वालेछा भाटिया आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष रो. डॉ. गिरीश पोफळे यांच्या उपस्थित क्लबचे अध्यक्ष रो. मिहीर यांनी आपले अध्यक्षपद ग्रहण केले. त्याच बरोबर क्लबच्या नव वर्षाच्या सर्वपदाधिकऱ्यांनीही आपली पदे स्वीकारली. २०२३-२४ च्या जिल्हा रोटरॅक्ट प्रतिनिधी, रो. सुष्मिता वालेछा भाटिया या ५२ व्या पदग्रहण सोहळाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्याने रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवलीच्या संपूर्ण सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले व नवीन कार्यकरणी मंडळाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अतिथी डॉ. गिरीश पोफळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post