दिवा, आरती मुळीक परब : साई सेवा रुग्णालयाचे उद्घाटन दिवा शहराचे शिवसेनेचे मा.नगरसेवक व उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात झाले.
हे रुग्णालय दिवा शहरातील जनते साठी पूर्ण वेळ सेवा देत असून मल्टीस्पेशालिटी व आय. सी. यू. विभाग देखील उपलब्ध आहे. तर सामाजिक दृष्ट्या हे रुग्णालय इतर रुग्णालया पेक्षा मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत उपयुक्त व्हावे याचा विचार करूनच आज आगरी महिला शक्ति प्रतिष्ठानच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे उपलब्ध केले आहे, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व संस्थापिका उषाताई मुंडे यांनी सागितले.
प्रसंगी रंजना मुंडे, सविता वायले, पुनम मुंडे, दीपिका मुंडे, सोनम मुंडे, भरती पाटील, ज्योती म्हात्रे, भरती वसंत म्हात्रे, प्रीती पाटील, योगिता मुंडे, रंजना तांडेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
रुग्णालयातील सुविधा दिवा वासियांसाठी उपलब्ध केल्याबद्दल शैलेश पाटील यांनी कौतुक करत दिवेकर नागरिकांसाठी एक उपयुक्त असे रुग्णालय सुरू झाले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले व आगरी महिला शक्ति प्रतिष्ठानच्या सर्व महिलांच अभिनंदन करत आभार व्यक्त केले.