अंबरनाथमध्ये उभे राहणार नवीन पोलीस ठाणे

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम येथील मोडकळीस आलेल्या पोलीस स्टेशनच्या जागेत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विशेष प्रयत्नांतून पोलीस स्टेशनची एकमजली नवीन इमारत उभारण्यात येत आहे.  या नव्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकामाची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांच्यासह पाहणी केली. 

      आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी परिमंडळ - ४ चे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांच्यासह या नवीन पोलीस इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या नवीन इमारतींमुळे येथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची होत असलेली गैरसोय टळणार आहे.  या इमारतीतील तळमजल्यावर अंबरनाथ पोलीस स्टेशन व पहिल्या मजल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय असणार आहे. तसेच उल्हासनगर -५ मधील हिललाईन पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेत देखील नवीन पोलिस स्टेशन उभारण्यात येत आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस क्वार्टरच्या ठिकाणी पोलिसांसाठी दोन २५ मजली इमारत उभारण्यासाठी देखील आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा पोलीस गृहनिर्माण मंडळाकडे पाठपुरावा सुरू असून या इमारतीमुळे पोलिसांच्या निवासाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.या पाहणी दरम्यान माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष  अब्दुलभाई शेख, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन कळसकर, हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post