श्रीमलंगगड विभागातील १०-१२ विद्यार्थ्याच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील भरघोस असे यश मिळवले आहे. त्यांच्याही यशाचा सत्कार झाला पाहिजे या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    दहावीचे विद्यार्थी प्रथम रुपेश ओमकार पवार यांनी ९२.४०%(पुंडलिक म्हात्रे हायस्कूल नेवाळी), दुसरा चैतन्य बारकू म्हात्रे ९२%( संत सावताराम हायस्कूल ढोकेगाव), तिसरा आस्था ब्रह्मदेव मोर्या ९१.८०% ( पुंडलिक मात्रे हायस्कूल नेवाळी) तर बारावीचे यशस्वी विद्यार्थी विशाखा दिलीप पाटील ८६.३३%,(जेसीएस हायस्कूल,भाल), प्रिया बाला राम ठोंबरे ८५.३३%(संत सावळाराम महाराज विद्यालय ,ढोके), शेजल काळू जाधव ८३.७३%(संत सावळाराम महाराज विद्यालय ,ढोके) यांचा आज सत्कार समारंभ करवले गावात करण्यात आला.

    या कार्यक्रमाच्या वेळेस चैनू जाधव-तालुका प्रमुख अंबरनाथ, रोशना ताई पाटील-महिला तालुका संघटक, अंबरनाथ, शिवदास द.गायकवाड - मातोश्री गुंजाई फाउंडेशन ,हिरामण पितळे -उपतालुका प्रमुख,अंबरनाथ, अंकुश पाटील - उपतालुका प्रमुख,अंबरनाथ, संजय फुलोरे-उपतालुका प्रमुख , अंबरनाथ, सुभाष गायकर- तालुका युवा अधिकारी अंबरनाथ, मदन चिकणकर सर (तालुका संघटक),  म्हात्रे (विभाग प्रमुख), रवी पाटील (सरपंच), साईनाथ ठाकरे (उपविभाग प्रमुख), प्रभाकर भोईर(शाखा प्रमुख), मुकुंद मढवी, पप्पू भोईर तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या वेळीस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मी सदैव करत राहीन असे आश्वासन दिले.



Post a Comment

Previous Post Next Post