100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तपासनीसांचे काम कौतुकास्पद - माजी आमदार नरेंद्र पवार

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : रेल्वेला अवघ्या एका वर्षात 100 कोटींचे रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तिकीट तपासनीसांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले. वरिष्ठ नागरिक संघातर्फे कल्याण स्टेशन मास्तर कार्यालयात आयोजित उत्कृष्ट तपासनीसांच्या सन्मान सोहळ्यात प्रमूख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

रेल्वे प्रशासनाच्या मुंबई मंडळ तिकीट चेकींग स्टाफसाठी गेल्या वर्षाचा कालावधी अतिशय लक्षवेधी ठरला. अवघ्या एका वर्षात या तिकीट चेकिंग स्टाफने एसी लोकलसह नियमीत लोकलमध्येही परिणामकारक चेकिंग वाढवली. ज्यामुळे मुंबई मंडळ तिकीट चेकींग स्टाफकडून रेल्वेला 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत मुंबई मंडळ तिकीट स्टाफच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावत जाईल अशा शब्दांत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कौतुक केले. यावेळी नरेंद्र पवार यांच्या हस्ते तिकीट तपासनीसांना छोटीशी भेट देऊन गौरविण्यात आले. 

या सन्मान सोहळ्याला मुंबई विभागाचे सिनियर डीसीएम बी. अरुण कुमार, डीसीटीआय नागेश संकपाळ, वरिष्ठ नागरिक संघाचे एस.आर. मुरहे, एस.के.श्रीवास्तव, मोहम्मद रफीक, सरदार आर. एस. भुसारी, श्रीकांत गरे, मंगेश भोसले, जी. के. ठोंबरे, सूत्रसंचालक डी.व्ही. रमण, शशांक दीक्षित यांच्यासह मुंबई मंडळाचे तिकीट तपासनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post