कल्याण ( शंकर जाधव) : कल्याण गणेश घाटावर सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना उचलण्या साठी योग्य नियोजन नसल्याने अनेक मंडळाचे गणपती सह गणेश भक्तांना ताटकळत बसावे लागले. विसर्जन घाटावर नियोजन सोडून पालिका अधिकारी गायब असल्याने गणेश भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कल्याण- डाेंबिवली महापालिकेने गणेश विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली असल्याचा दावा केला होता. मात्र मआहे.कल्याणहापालिकेचा हा दावा कल्याण पश्चिमेतील मुख्य दुर्गाडी गणेश विसर्जन घाटावर फोल ठरला आहे.कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी गणेश घाटावर कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेकडून घरगुती गणेश मूर्ती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले होते मात्र 27 सप्टेंबर रोजी काही सार्वजनिक मंडळाकडून आपल्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी कल्याण येथील गणेश घाटावर आले असता या सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्त्याना उचलण्या साठी लागणारे फोर किल्प क्रेन नसल्याने बाप्पांना विसर्जन घाटावर वेटिंगला राहावे लागले. विशेष म्हणजे विसर्जन घाटाचे नियोजन पाहणारे पालिका अधिकारी विसर्जन घाटावर नियोजन सोडून गायब असल्याने गणेशभक्तांनी तीव्र संताप व्यक्त करत अखेर संतापलेल्या गणेश भक्तांना पोलिसांनी शांत केले मात्र मध्य रात्रीपर्यंत पालिका अधिकारी आणि गणेश मूर्तींना उचलण्यासाठी लागणारे फोर किल्प क्रेन न आल्याने लहान मुलांसह महिलांना भर पावसात भिजत उभे राहावे लागले.
तर या बाबत त्या ठिकाणी असलेल्या पालिका मुकादम यान्हा विचारणा केली असता त्यांही अधिकारी जेवून गेले असल्याचे सांगत उचलण्या साठी क्रेन येत असल्याचे सांगितले मात्र त्याच्या आश्वासनानंतर ही रात्री १ वाजेपर्यंत क्रेन आली नाही.