Star pariwar award : सवीने ईशानला केले अनोख्या पद्धतीने प्रपोज

 

स्टार परिवार अवॉर्ड्सच्या मंचावर तम्मा तम्मा या गाण्यावर धरला जबरदस्त ठेका

पाच वर्षांच्या गॅपनंतर स्टार परिवार अवॉर्ड पून्हा सज्ज

स्टार परिवार अवॉर्ड्स पाच वर्षांच्या गॅपनंतर स्टार प्लसवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे आणि चाहते त्यासाठी खूप उत्सुक आहेत. स्टार परिवार अवॉर्ड्स अगदी त्याच्या रेड कार्पेटपासून आतील परफॉर्मन्सपर्यंत एक अविस्मरणीय आणि चमकदार सोहळा ठरला. या सोहळ्याला रुपाली गांगुली, प्रणाली राठोड आणि सायली साळुंखे ते विजयेंद्र कुमेरिया, अविनाश मिश्रा, नेहा सोलंकी, भाविका शर्मा, शक्ती अरोरा अशा अनेक स्टार प्लसच्या कलाकारांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात स्टार प्लस शोमधील कलाकारांचे विविध परफॉर्मन्स आणि अभिनय सादर झाले. यातील एक आकर्षण म्हणजे या सोहळ्यात सवीने इशानला अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले आणि एक अनोखा क्षण सगळ्यांनी अनुभवला. भाविका शर्मा उर्फ सवी यांनी तम्मा तम्मा या गाण्यावर उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला, तर शक्ती अरोरा उर्फ इशान आणि सुमित उर्फ रिवा यांनी सवीला प्रोत्साहित केले आणि तिचा उत्साह वाढवला कारण सवी पहिल्यांदाच स्टार परिवार अवॉर्ड्समध्ये परफॉर्म करत आहे.

या दरम्यान ईशानला देखील स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने एखाद्या नायकाप्रमाणे स्टेजवर एन्ट्री घेतली. इतर साथीदारांनी त्याला खांद्यावर घेऊन स्टेजवर नेले आणि सवीने एकदम अनोख्या पद्धतीने ईशानवरचे आपले प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त केले. 

सवी आणि ईशानच्या बहारदार प्रेमकथेचा साक्षीदार होण्यासाठी पहात रहा, स्टार परिवार अवॉर्ड्स 1 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता, केवळ स्टार प्लसवर.

Post a Comment

Previous Post Next Post