स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर प्राथमिक शाळेचा उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव ) : "एक तास, एक ध्यास स्वच्छतेची धरूया कास,प्रदूषण विरहित वातावरणात घेऊया श्वास" राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर प्राथमिक शाळेत पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आलेल्या परिपत्रकानुसार ' एक तास,एक साथ स्वच्छतेसाठी' या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या उपक्रमाचा स्वच्छता पंधरवड्याचा समारोप करण्यात आला.
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका भावना प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता पंधरवडा नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत चित्रकला, घोषवाक्य लेखन, परिसर स्वच्छता व वर्ग सजावट अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात आले. आज रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या वेळात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे प्रतिमापूजन करण्यात आले व परिसर स्वच्छता करून घेण्यात आली.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक पालक व शिक्षकेतर कर्मचारी आनंदाने सहभागी झाले.