डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला. तसेच "भावी खासदार" असा उल्लेख असलेला केकही कापण्यात आला होता.मनसेकडून कल्याण लोकसभा मतदार संघात प्रमोद ( राजू ) पाटील यांना उमेदवारी मिळतेय का अशी राजकीय चर्चा सुरू आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघातून डॉ.श्रीकांत शिंदे यांचे नाव निश्चित असताना आता त्यांच्या समोर निवडणुकीत मनसेकडून प्रमोद ( राजू ) पाटील हा चेहरा असेल का अशी चर्चा सुरू आहे.मनसैनिकांनी तर 'भावी खासदार' असा लिहिलेला केक कापून आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.डोंबिवलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे.
Tags
महाराष्ट्र