शहाड : उल्हासनगर येथील शहाड येथील सेंच्युरी कंपनीत ( century compny) भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल दोन कामगारांचा मृत्यू, दोन बेपत्ता तर सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना कंपनीच्या CS2 डिपार्टमेंटमध्ये घडली. यात काही कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनी प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
उल्हासनगर परिसरात अनेक कंपन्या आहेत. आज सकाळी अचानक कंपनीत मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या तब्बल पाच ते सात घरांना मोठे हादरे बसले. या स्फोटांमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर कंपनी परिसराला सील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कंपनीला बॅरीगेटिंग केली असून प्रसार माध्यमांना देखील कंपनीमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
स्थानिक आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.